२१/४/१२

गरीब माणुस दारु पितो,
मध्यमवर्गीय मद्यपान करतो,
तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात!
 काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते,
काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो,
तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते!
गरीब माणुस करतो ते लफडं,
मध्यमवर्गी माणुस करतो ते प्रेम,
तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर!
शब्दाने शब्द वाढला की कविता होते,
शब्दाने शब्द वाढला की भांडण होते
शब्दाने शब्द वाढला की लेखकाची रॉयल्टी वाढते
सगळेच म्हणतात_____
ती असावी अशी ?
फुललेल्या गुलाबाची कळी जशी.........
ती बोलावी अशी ?
सुरात कोकिळा गावी जशी..........
...
ती हसावी अशी ?
लहानशी भाऊली हसावी जशी..........
ती दिसावी अशी ?
अप्सरा पृथ्वीवर यावी जशी............
माझी परी मला हवी कशी ?
ती मला हवी अशी.........
चंद्राकडे हि नसावी चांदणी जशी...........
चंद्राकडे हि नसावी चांदणी जशी.................

मी कधीच नाही म्हटलं कि तू माझी आहेस आपल्या मैत्रीच्या नात्यात पहिल्यापासून परकेपणा होता तो दूर करण्याचा माझा अट्टाहास नह्वे तर केविलवाणा प्रयत्न होता तुला ओळखण्याच्या नादात मी स्वतालाच ओळखू लागलो नि जे काही हरवलं होतं ते सारं शोधू लागलो सापडल्या बऱ्याच गोष्टी, नह्वे नह्वे सारं काही मिळाला पण डोळे उघडून पाहिलं, तेव्हा कुठे आहेस? मी कधीच नाही म्हटलं कि तू माझी आहेस चुकलो असेन मी बऱ्याच वेळा जीवनात नि तू कधीच तिथे नव्हतीस मला सावरण्यात मग आता का तुझी इतकी नड जाणवते? उत्तर माहित नाही पण प्रश्नाने वेड लागते तुला विचारावा म्हटलं तर तू कुठे आहेस? मी कधीच नाही म्हटलं कि तू माझी आहेस तुझी ती कातरवेळ जेव्हा माझा सुगावा घेईल त्या दिवशी माझ्या जन्माचा सार्थक होईल मी अजूनही स्वप्न पाहतो तुझ्या माझ्या मीलनाच पण ते स्वप्न माझ्या एकटयाचच आहे, तू कुठे आहेस? मी कधीच नाही म्हटलं कि तू माझी आहेस मी तुझा होऊ शकलो नाही तरी मी माझाच आता झालोय देवाकडे फक्त तुझ्या सुखाचीच प्रार्थना करतोय एकटा नाही मी सोबत तुझ्या आठवणी आहेत पण वेडं मन सतत विचारेल तू कुठे आहेस? मी कधीच नाही म्हटलं कि तू माझी आहेस .....

deeprahul collection

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा