२१/७/१२

मुख्य पान

M4marathi.com , No.1 Marathi Website

  • ती जोशात होती
    मी बेहोश होतो
    ती आशेत होती
    मी नशेत होतो

    ती सूरात होती
    मी बेसूर होतो
    ती तालात होती
    मी बेताल होतो

    ती लयीत होती
    मी सयीत होतो
    ती सहीच होती
    मी नाहीच होतो
  • घराकडे येताना मला काल पावसाने गाठले,

    जोरदार होता पाउस, सगळीकडे तळे साठले....!

    भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी,

    वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची राणी...!

    जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव,

    तिने साद घालून काळजावरती केला...
  • पाहीले मी पाचोळ्याला
    फांद्याना लटकून रडताना,जगताना
    तर कधी फुलण्याआधी
    कळी गळून पडताना
    ऐन बहरात फुलांचा
    रंग उडून जाताना
    अन कुठे सुरकुतल्या देहातूनही उरला
    गंध ओवळून टाकताना

    पाहीले मी डेरेदार वृक्षाखाली
    सावली हरवून जाताना
    तर कुठे इवल्या रोपाखाली
    वारूळ उभे ...
  • या पावसाला काय वेड लागलंय का...?
    वेळ ना काळ
    केव्हाही येतो..
    सकाळ ना संध्याकाळ
    उगाच आपला बरसतो...
    अरे,
    याला कळत कसं नाही...!
    ती मला भेटायला येणार होती..
    वेळात वेळ काढून
    निवांतपणे थांबणार होती...
    ती येणार म्हंटलं की,
    त्याचा कसा होतो बघा जळफळाट..
    त्याच्या...
  • शब्द म्हणजे काय असते ?
    ओघळणारा झरा असते
    सळसळणारा वारा असते
    शब्द म्हणजे असतो डोंगर
    कधी सुगंधी माती असते

    शब्द म्हणजे प्रेम असते
    शब्द म्हणजे माफ़ी असते
    शब्द म्हणजे आठवणींची
    भरलेली टाकी असते

    शब्द कधी असती सुंदर
    कधी हृदयास भिडनारे
    शब्द असती रडता-रडता हसवणार...
  • Marathi Love Poems



  • खंर प्रेम करणारी सर्वचं नसतात,
    अर्ध्यावर सोडून देणारे हि भरपूर असतात..
    खोटी स्वप्ने दाखवुन ह्रदयाशी खेळतात,
    गरज असेपर्यँत आपलं म्हणतात,...
  • प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे

    म्हणून ते प्रेम करायचे नसते,

    नाही मिळाले ते परत तरी

    आपण मात्र त्याच्या भावनाना जपायचे असते,

    दुखवले कितीही तिने

    तरी हसून तीच्या परत
    समोर जायचे असते,

    कुठलीही अपेक्षा न ठेवता देत राहिल्याने

    प्रत्येकवेळी ते प्रेम वाढतच असते,

    ...
  • आयुष्यात प्रेम करायचय मला ...
    दूर कुठेतरी समुद्रकिनारी
    हातात हात घालुन बसायचय मला,
    आकाशातील तारकांकडे बघताना
    भविष्याचे हितगुज करायचय मला,
    आयुष्यात प्रेम करायचय मला ...
    माझ्या मांडीत डोक ठेऊन
    तिला झोपी गेलेल पहायचय मला,
    तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
    स...
  • पुस्तकाच्या आत दडवून
    तिचाच फोटो बघत असतो
    माझा हा वेडेपणा
    तिला कुठे ठाऊक असतो

    तिची यायची जायची वेळ
    पक्की मला ठाऊक असते
    मीही साधतो तिच नेमकी
    पण ती कुठे भावूक असते

    मीच मरत असतो आपला
    तिच्यापाठी वेड्यासारखा
    दिसतो अचानक तिच्यासोबत
    बॉयफ्रेंड तिचा रेड्यासारखा
  • प्रेमात तुझ्या पडलोय तर
    मलाच नमतं घ्यायला हवं
    खूश तुला ठेवण्यासाठी
    सर्वस्व माझं द्यायला हवं

    इतर सर्व गोष्टींपेक्षा
    तुलाच महत्व द्यायला हवं
    प्रेम तुझं वाढेपर्यंत
    सांभाळूनही घ्यायला हवं

    आकंठ तुझ्या प्रेमात बुडून
    प्रेमात तुझ्या न्हायला हवं
    प्रेम ऊतू गेलंच...
  • MARATHI

    • प्रेमात तुझ्या पडलोय तर
      मलाच नमतं घ्यायला हवं
      खूश तुला ठेवण्यासाठी
      सर्वस्व माझं द्यायला हवं

      इतर सर्व गोष्टींपेक्षा
      तुलाच महत्व द्यायला हवं
      प्रेम तुझं वाढेपर्यंत
      सांभाळूनही घ्यायला हवं

      आकंठ तुझ्या प्रेमात बुडून
      प्रेमात तुझ्या न्हायला हवं
      प्रेम ऊतू गेलंच तर
      मला ते प्यायला हवं
    • पुस्तकाच्या आत दडवून
      तिचाच फोटो बघत असतो
      माझा हा वेडेपणा
      तिला कुठे ठाऊक असतो

      तिची यायची जायची वेळ
      पक्की मला ठाऊक असते
      मीही साधतो तिच नेमकी
      पण ती कुठे भावूक असते

      मीच मरत असतो आपला
      तिच्यापाठी वेड्यासारखा
      दिसतो अचानक तिच्यासोबत
      बॉयफ्रेंड तिचा रेड्यासारखा
      Logged
    • बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?
      मास्तर : बर बाळा, विचार .

      बंडू : मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..??
      मास्तर: अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ?
      बंडू: जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर भट्टी नाही माहित तर मग आम्हाला देशातली पहिली अणुभट्टी कुठे लागली हे का विचारता ....?
      मास्तर : अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ?
      बंडू : मग आम्ही काय दररोज अणुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला .........

    ..

    • जो माणुस 
      सगळ्यांना खुश ठेवत असतोँ..
      जो माणुस सगळ्यांची काळजी घेत असतो...

      तोच माणुस स्वताच्या जीवनामध्ये..,
      स्वताला एकटा समजत असतो ....♥♥
    • काही अलगद हातातून सुटले..
           जे माझे कधीच नव्हते..
      तर मग का मन दुखले..
           का डोळे आता उगाच झाले ओले..

      ------------------------------------

      मी माझे मनाला खूप समजावून बघितले..
           मनाने तरी कितीदा फक्त तुझेच नाव घेतले..
      शब्द शब्द रुतला उराशी शेवटचा भेटीतला..
           हुंकारल्या राती अन मनाचा प्रत्येक कोपरा पुन्हा ओला..

      -----------------------------------------------------------------

      काही जाणीवा अबोल असल्या तरी हव्या असतात..
           डोळ्यांना पाझर फुटावे इतक्या दूर त्या ...राहतात..
      स्मरणिका हळवी झाली जरी तिच्याच श्वासांनी
           तरी देखील तिच्या आठवांचे थवे मनावर साठतात..

      ---------------------------------------------------------------------

      आज पुन्हा तुझी आठवण..
           अन पुन्हा गहीवरेल मन..
      पुन्हा तीच ती कातरवेळ तोच नदीकाठ भेटीचा
           अन डोळ्यात तरंगणारा एक एक क्षण..

    • पुन्हा झाली आठवण
      खूप गोड होते बालपण

      निरागस होते मन
      नव्हता मोह! काय असते धन?
      ...
      लुटला होता आनंद
      परंतु त्याचा फक्त उरला आहे गंध

      जस जसे मोठे झाले
      बालपण दूर कोठे हरवून गेले

      पण जेव्हा बालपण सुटले
      तेव्हा तरुणाने गाठले

      नवं स्वप्नांनी भारावले
      विश्वाचे रूप प्रथमच पहिले

      लागला काही वेळ
      गर्दीशी साधायला मेळ

      नव्या विश्वाचे आव्हान मोठे
      पुन्हा वाटले आपणं आहोत छोटे

      जिद्दीची, स्पर्धेची तरुणाई
      तसेच मदतीला धावून येई

      मला वाटते या विश्वात
      आकांक्षा, अपेक्षा, यश यांमध्ये न्हात

      पुढे पुढे जयायचे
      प्रत्येक आव्हानाला सर करायचे

      त्यात आले अपयश जरी
      आत्मविश्वास ठेवून भारी

      मानायची नाही हार
      कारण आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार
    • तुला दिलेली वचनं
      मी माझ्या मनापासून पाळले होते...
      तू नाही ठेवली किम्मत त्यांची
      म्हणुन काल मी माझे प्रेत जाळले होते...

      झाली होती गर्दी फार
      जळतान्ना मला पहायला...
      काही जनांना घाई फार
      राख़ नदित वहायला...

      आग पूर्ण विझली तरी
      प्रेत माझे जळतच होते...
      राख़ वेचनार्यांचे काल
      हाथ आगिने सलत होते...

      माझ्या राखेचा एक कण....तुझ्या हातावर.
      प्रेमात तुझ्या मिळाले मला जे एकटेपण
      त्याचा कस् माझा विझता श्वास
      शेवटच्या या वळनावर आता प्रिये
      शेवटची पुन्हा तुझीच आस ......

      एकदा तुझा हात हातात धरून
      निशब्द उभे रहायचं आहे... उमजुन घे
      नाहीतर तुझा हात तूच पकड़ स्वतः
      असेल तुझाच पण माझा समजुन घे

      कस सांगू मी ह्या जगाला कि तू माझ्यासाठी काय होते ,
      तुझ्या डोळ्यातून अश्रू पडताना माझे डोळेही भिजून जाते ...

      कस सांगू मी ह्या जगाला कि तुझे माझे नाते काय होते ,
      आपलं नांत तर, नातांच्या अंधकारातून निघणारी एक ज्योत होते ..

      कस सांगू मी ह्या जगाला कि तू माझे सर्वस्व आहे ,
      तुझ्या विना मी तर एक न चकाकणार चांदण आहे ...
    • जमलंच तर I LOVE U बोलून बघ
      आयुष्याची ही घडी
      थोडीशीच उलघडून बघ
      वाट पाहतोय तुझी मी
      या चार शब्दांची
      आतुरता दाटली मनात
      ओढ तुझ्या होकाराची
      झालीच जर का तू माझी..
      तर तुला काळजात जपून ठेवीन
      दगा दिलास या प्रेमाला
      तर
      हेच काळीज काढुन तुझ्या चरणी ठेवीन
      प्रेम करतो तुझ्यावर
      न हा शब्द उचारू नकोस
      लाख दुवा मागतोय मी त्या प्रेमदेवाकडे
      मन त्याचा तोडू नकोस
      तुझ्या होकारवायूची गरज
      असलेला प्रेमाच्या कोमात गेलेला
      फक्त तुझाच होवू पाहणारा
      तुझा..........
    • एकदा ‘ मक्या ’ आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता .. .
      .
      .
      ... बायको : अव्हा .. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू....
      .
      .
      .
      मक्या : आग येडे ... हा काय ... साधा शाम्पू ... नाही ..., हा तर head & shoulder आहे .......
    • का होतं मन असं हळवं
      कोणाच्या तरी आठवणीने ?
      एक एक क्षण का वाटे युगासमान,
      त्याच्या दूर जाण्याने ?

      भेटीनंतरही का .....
      भेटण्याची आस असते ?
      त्याच्याच गोड स्वप्नांमध्ये
      का रात्र सारी हरवते ?

      त्याने फक्त आपल्यालाच पहावं,
      आपल्याशीच बोलावं.. असं काही वाटू लागतं
      प्रत्येक छोटी गोष्ट ही
      त्यालाच सांगावी म्हणून मन आतुरतं

      कळलं का तुम्हाला, अचानक
      असं वेड्यासारखं का होतं ?
      दुसरं काही नाही .........
      यालाच तर म्हणतात " प्रेमात पडणं "zzzzz
    • गुढग्यावर जोर देत तुकाराम उठला. उठताना त्याला जाणवलं की गुढग्यातून कळ निघतेय; शरीर पूर्वीसारखं कामाला साथ देत नाही. सवय असली म्हणून शरीरही किती साथ देईल? त्यानंही आता पन्नाशी पार केलेली होती. वर पैसे नाहीत म्हणून अंगावर काढलेले किरकोळ आजार.
      घराकडे चालता चालता तो विचार करू लागला,"कायीबी मजूरी सांगी राहाले! इतली कुढी राहाते का?" दोन वरीसमांगे तं ऐंशी रुप्ये रोजावरबी याचे! आताच काहून दिडशे रुप्ये सांगी राहाले? त्याहचंबी बराबरे म्हना! महंगाईनं त्यायचीबी कमर ढीली करी टाकेले; न गावात जे बी राहाले ते जुनेच मजूर राहाले! नविन पोरं उठले का चाल्ले जडगावले, भुसावलले, चाल्ले नाशिकले अन तढी पुन्यात तं गंज भरेले! वावरात काम क-याची लाज वाटले त्याह्यले! सगडेच का हाफिसर होनारे? आढी खेड्यात मजुरीचे शंभर रुप्ये भेटी राहाले रोजाचे! तढी जडगावले दिड हजारात घसता! काय भेटते? फोलपटं? या-जा चा खर्च अल्लग! पन याह्यले सांगीन कोन? शिकेल जाई राहाले तं ठीके, पन हे आठवी फेलबी? बरं घरचं वावर हाय नं? आढीच नीट मेहेनत केली तं त्या शिकेलपेक्षाबी जास्ती कमाडतीन आढी! पन आपलं ऐकीन थोडीच कोनी? पह्यलेच तं पावसानं तान देल्हे. हीरीबी तं सपाट झाल्या! थोडा पाऊस पड्याचे चिन्ह दिशी राहाले तं हे मजुरीचं नाटक उभं राहालं! काय कराव मानसानंबी? बरं किशोरले सांगावं तं तेलेच तेची पडेले! अन आपुनबी कायले सांगावं? आपला तान आपल्याजोय! तो तढी उग्गीच कायजी करत बशीन!"
      विचारांची वावटळ डोक्यात घेऊनच तो घरी आला. मंगला भाकरी थापत होती.
      "चुल्ह्यावर काहून करी राहाली? इश्टोले काय रोग झाला?" त्यानं संतापातच विचारलं.
      "घासलेट कुढीये तेच्यात? सकाडच्या चहालेच संपलं नी का? पह्यलेच तं घासलेट भेट्याची मारामार!" तिने शांतपणे उत्तर दिलं. "भेटीन तं पाहाजा ना घासलेट!"
      "नको वो माय मह्यं डोस्क खाऊ! येकतं सकाडचा मजूर शोधी शोधी गयरा पकी जायेले मी! करनं अशीन चुह्यावर तं कर नायतं राहू दे!"
      आपल्या नव-याचं डोकं भडकलंय हे समजून मंगला शांत राहीली. काही वेळ असाच शांततेत गेला. तुकारामला मनोमन वाटलं आपण आपला राग तिच्यावर काढायला नको होता. बिचारी! कसा का होईना पण आपल्या संसाराचा गाडा ओढतेय ती! त्याच्या मनात एकदम कणव दाटून आली. गेली सत्तावीस वर्ष त्याच्या डोळ्यासमोरुन तरळून गेली. तो विचार करत होता, सत्तावीस वर्षांपूर्वी मंगला आपल्याशी लग्न करुन या घरात आली, तेव्हाची मंगला आणि आताची मंगला यात कितीतरी फरक पडला होता. तेव्हा आपलंबी मोठं वावर होतं, हीर होती. पन धीरेधीरे महंगाईनं सगडाच वांधा व्हायले लागी गेला. तरीबी तिनं कह्यीच कुरकुर केली नह्यी. उषाच्या लग्नात तं अर्धं वावर इकनं पडलं! खरचं! मंगला नसती तं माह्यासारख्या एड्याचा संसार कसा झाला असता देवाले मालूम!
      "मंगले, पेरा तं बी व्हीन की नी आपला?"
      "काहून असं म्हनता? आढलोंग तं झालंच की नी? मंग आताबी व्हीन!"
      "तसं नी गं! पन काय व्हयेले, की निस्ती हायब्रीड टाकीसन बी परोडनार नी. उडीद बी तं टाकने पडतीन! पन गोष्ट अशी व्हयी जायेले की हायब्रीडची बिजवाई घेयाले गेला की उडदाले पैशे कमी पडी राहाले. बरं हायब्रीड तं टाकनीच पडीन! बैलायले तं देनंच पडीन नं! नाई तं पेंड्या तं गय-या महंग्या व्हई जाता! बरं हायब्रीडले भाव बी तं काई नई! अजून थोडेशे हाये पैशे, पन ते सुपर फास्फेटले लागतीन नं! बरं व्यापा-याकडून घ्यू तं बारे उषाच्या लग्नाचेच बारे फिटेल नी! बरं मजूर बी तं निस्ते पे-याचे दिडशे रुप्ये रोजचे सांगी राहाले! इतला तरास पह्यले कहीच नोता झाला! निस्ती पाभर ध-याचे दिडशे रुप्ये! एक तं ह्या महंगाईनं कमर मोडी टाकेले! येक ठिगय बुज्याले जावं तं दुस-या ठिकानी फाटते! काय करावं कही समजी नी राहालं! आपल्या जवायाकडून मांगले असते तं त्याह्यलेबी लागतीन ना! त्याह्यलेबी तं पेरनंय! न खरी बात सांगू का, जवाई मानसाजोय बी पैशे मांगनं बराबर नी वाटत मले! सोसायटीचेबी पह्यलेचेच फिटेल नी तं नवं कर्ज मिड्याची बातच सोड! इचार करी करी मह्यं डोस्कं फुटी जाईन आता. हा हंगाम कोरडा गेला की मगन संपले आपून!"
      मनातलं सगळं भडाभडा बोलून टाकल्याने त्याला जरा मोकळं वाटलं. भिंतीला टेकून तो धापा टाकत बसला. मंगलाचा चेहेरा चिंतेच्या जाळ्यानी ग्रासून गेला.
      "आवो, तुमी सोतावर आन त्या इठ्ठलावर इस्वास ठेवा! आतालोंग त्यानेच कायजी केली नं आपली? जवजवा असं काही झालं तवातवा कसंबी करीसन आपलं काम पूरं झालंच नं? आपल्याजोय येकतं पैसा नोता, मंग बाकी कुनाले जाऊद्या, आपल्यालेतंबी वाटलतं का की आपल्या ल्योक ईंजिनेर व्हीन? कसंबी करीसन किशोरले ईंजिनेर केलाच नं आपूननं? तो बी गयरा हुश्शार निंघाला नं तेनं चीज केलं. नाहीतं आढीच राहाला असता नं काहीमाही कामं करत? आता त्याचीबी लाईन लाग्याले थोडा टाईम तं लागीनंच म्हना. काई काजयी करु नका. व्हईन सगडं बराबर! चाला, जी घ्या! त्या इठ्ठलाले हाय आपली कायजी! तो करीन बराबर! चाला तं, भूक लागेलेनं तुम्हाले? चाला!" मंगला इतकं बोलली खरं, पण तिचंच तिला कळत नव्हतं की ती नक्की समजूत कुणाची काढतेय? नव-याची की स्वत:ची?
      यांत्रिकपणे तो उठला. भाजी भाकरी खाता खाता त्याचं विचारचक्र चालूच होतं. हात धुवुन त्याने चंची सोडली. तंबाखूची चिमूट तोंडात टाकून त्याने मंगलाला दारातूनच आवाज दिला, "आला गं मी पाहिसन कुनी भेटते का!"
      चौकात त्याला नाना ब-हाटे भेटला.
      "काय तुकारामभाऊ, कुढी?"
      "काई नाई भो, पे-याचा बंदोबस्त करी राहाला. सोसायटीतून काही भेटीन तं बरं व्हीन!"
      "कायले त्या चक्करमधी पडतू? तुले मालूम नी का लोकायचे गयरे पैशे डुबाले तेच्यात? नं अठरा टक्क्यायनं आपल्यासारख्याले परोडीन का?"
      अठरा टक्के ऐकून तुकारामच्या डोळ्यासमोर भरदिवसाही काजवे चमकले.
      "खरंय तुह्यंबी नानाभो, पन पैशेभी कुढून उभे क-याचे? शेती करनं बी जुगार व्हयी जायेले! आढी हारु हे मालूम अशीसनबी पैशे तं लावनेच पडता!"
      विचारांच वादळ डोक्यात घेऊनच तो घराकडे वळला. सगळं जग भोवताली गरगर फिरतंय, आपण मोठ्या आवर्तात सापडलो आहोत असं त्याला वाटायला लागलं.
      घरी येऊन तो भिंतीला टेकून आढ्याकडे नजर लावून बसला. कितीतरी वेळ तो तसाच बसून होता. मंगला मन लावून आपलं पाकिटं चिकटवायचं काम मनापासून करत होती. जळगावहून एका कपाळावर-च्या टिकल्या बनवणा-या कंपनीचं टिकल्यांचे पाकिटं बनवायचं काम तिला मिळालं होतं. शंभर पाकिटामागे तिला तीस रुपये मिळायचे. ते काम इतकं किचकट होतं दिवसभरात जेमतेम शंभर पाकिटं चिकटवून व्हायची. तरी ती बिचारी घरातलं सगळं काम आवरुन ते काम करायची. तेवढाच पैशाला पैसा जोडला जातो.
      दुपारी नेहेमीच्या सवयीने तुकारामने गोडमिट्ट चहा घेतला आणि तो परत घराबाहेर पडला. एसटी स्टॅन्डवर येऊन बसला. तासभर विचार करुन त्याने सावद्याची गाडी पकडली. सावद्यात त्याचा जुना मित्र प्रभाकर राहत होता. तो पण शेतकरीच होता, पण त्याची बागायती होती, केळीचा बाग होता.
      "परभाकर, ओ परभाकर!" त्यानं प्रभाकरच्या अंगणातूनच आवाज दिला. आवाजासरशी प्रभाकर घराबाहेर आला.
      "ऑं! तुकाराम तू! असा यकदम!" प्रभाकरच्या चेहे-यावरचे आनंद आणि आश्चर्य आणि आनंदाचे भाव लपत नव्हते. "ये ये, नं असा मधीच कसाकाय आला तू? फोनगिन बी नी! आत्ता बारे मी वावरातच जाई राहालता. बोल काय म्हन्तू?"
      दोघंही पडवीत टेकले.
      "परभाकर, अरे मले पेरा क-याले थोडा पैसा कमी पडी राहालता! म्हटलं तुह्याकून काई मदत व्हईन तं पाहू म्हनून आल्ता मी!"
      "कितले पाह्यजेल?"
      "दहा हजार तरी लागतीन! उडदाची बिजवाईभी घेनीये!"
      "तुकाराम वाईट वाटी नको घेजो, पन दहा मुष्किले गड्या! केडीचे भाव उतरी गेले तं मलेच फटका पडी जायेले. मह्याकून जास्तीत जास्ती चार हजार होतीन. खोटं नी सांगत!" तुकाराम विचारात पडला, प्रभाकर खोटं बोलण्याचं काहीच कारण नव्हतं.
      "चालतीन, चार बी चालतीन! सहाचं मी बघतू! देतो तुले हंगाम आला की!"
      "चालीन नं भो! कव्हाबी दे! तुह्या सोयनं पाह्यजो!"
      प्रभाकरकडून चार हजार घेऊन तुकाराम घरची वाट चालू लागला. सहा हजार आणखी जमवण्याच्या विवंचनेतच तो घरी आला. पैशाचा त्याला आता कुठलाच मार्ग दिसत नव्हता.
      "कुकडी गेल्ते वो? पु-या गावात कह्यीच पत्ता नोता तुमचा! मह्या जीव निस्ता वरखाली क-याले लागी गेल्ता नं! सांगिसन जायले काय झालतं तुम्हाले?" मंगला करवादली.
      "मी सावद्याले गेल्ता परभाकरच्या आढी. त्येच्याकून चार हजार घी आला. सहा हजाराचं पाही घ्यू! हा तुले सांग्याचच राहालं ह्ये चूक झाली माह्याकून मह्या डोक्यातच नी राहालं तुले सांग्याचं पैशाच्या इचारात!"
      मंगला विचारात पडली. "कावो, ह्या मंगयसूत्र गहान ठीसन भेटतीन का काही?" तिने विचारलं.
      "येडी झाली का! पह्यलेच तं तुह्यावाल्या बांगड्या मोडीसन उषाच्या लगनाले ठिगय लावलता आपू! मंगयसूत्र बी मोडती का? काहीबी इचार करी राहाली! गप बैस! मी करीन काय क-याचं ते!" तुकाराम संतापला. "आढी लोक पान्याची वाट पाही राहाले, न पानी दोन दिस लेट पडलं तं मी तेच पाही राहाला! पैशे उभे क-याले दोन दिस भेटतीन तं बरंच व्हीन!"
      पैसा, पाऊस आणि पेरणी यांची वावटळ त्याच्या घरावर घोंगावत होती आणि कधी त्याचं चक्रीवादळ होईल, काहीच भरवसा नव्हता.
      तेव्हड्यात किशोर घरात आला. हातात भलीथोरली बॅग. खूप थकलेला दिसत होता.
      "का रे भो, असा मधीच? काय झालं?" तुकाराम आणि मंगलाने एकदमच विचारलं.
      "काई नई, मले वाटलं याचं तं सुट्टी घीसन यी गेला मी!"
      "न इतलं सामान!"
      "हा, तढी जे जे नी लागी राहालतं ते घी आला मी घरी!"
      ""चाल जेयाले!"
      किशोर एक शब्दही न बोलता जेवत होता. तुकाराम आणि मंगलाला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. हा नेहेमीचा किशोर वाटत नव्हता. वरुन शांत असलेल्या पण आतून धुमसत असलेल्या ज्वालमुखीसारखा वाटत होता तो.
      "आई, मी गयरा थकी जायेले. मले सकाडले लवकर उठाडजो नोको." एवढंच बोलून तो बाहेर पडवीत झोपायलाही गेली. तुकाराम आणि मंगला एकमेकांकडे बघतच राहीले.
      कंदिलाच्या प्रकाशात प्रश्नांची सावली अजूनच गडद होत होती.
      सकाळी किशोर उठला तसा सूर्य बराच वर आला होता. घरात कुणीच नव्हतं. तो पाच मिनिट पडवीत तसाच बसून राहिला. तेवढ्यात त्याला डोक्यावर पाण्याच्या दोन कळशा आणि कमरेवर पाण्याचा हंडा घेऊन येणारी आई दिसली. त्यानं चटकन पुढे होत तिच्या हातातला हंडा आणि एक कळशी घेतली.
      "दादा कुढी गेले वो आई?"
      "वावरात गेले असतीन नाही तं मंगन गावातच असतीन."
      "काहून?"
      "अरे पे-याले पैशे कमी पडी राहाले. कोनाच्या आढी भेटतीन तं पाही राहाले."
      आंघोळ आणि न्याहारी आटोपून किशोर घराबाहेर निघून गेला.
      तीन दिवस झाले तरी तुकारामच्या हाताला काही यश मिळत नव्हतं; आणि किशोर गेले तीन दिवस जळगावला चकरा मारत होता. पण कशासाठी, ते तो घरात बोलतच नव्हता.
      एकमेकांवरच्या प्रेमापोटी मायबाप आणि मुलगा एकमेकांपासून आपापल्या विवंचना लपवत होती.
      चार दिवस झाले अजून याची सुटी संपत कशी नाही म्हणून मंगलाने त्याला टोकलंच. तो म्हणाला, "आयिक, तुले मालूमेका, मी जडगावले काऊन जाई राहाला? ऐक, मह्यावाली नोकरी गेली. कंपनीकडे गाड्यायच्या आडरीच नी तं तेबी काय करतीन? मह्यासारख्या पाचशे लोकायच्या नोक-या गेल्या मह्या कंपनीत. तेच्याकरता मी जडगावले काम शोधी राहालता. तढी एकाने मले बोलायेले गुरुवारी. तढल्यापेक्षा पगार कमीये आढी, पन काम तं हाये. तुमी कायजी करसान म्हून मी सांगी नी राहालता!" त्यानं सगळं एका दमात सांगून टाकलं.
      हे सगळं ऐकून मंगला हतबुद्धच झाली.
      "असं कसं झालं भाऊ? आढलोंग तं ठीकच व्हतं नं?"
      "आई, ह्ये मंदीये, व्हयीन येखाद वर्षात सगडं ठीक! तवर हातावर हात धरी बसू बी तं शकत नी नं आपू! न आढीबी तं काम भेटीच राहालं ना! तढी निस्ता रिकामा बसला अस्ता तं मी येडाच व्हयी गेला अस्ता. पैसा तं यी नी राहाला, अन रोजचा खर्च तं चालूच राहातो. मगन मी आढी ई गेला."
      मंगलाचा चेहेरा क्षणभर विचारमग्न झाला, पण क्षणभरच! दुस-याच क्षणी ती किशोरला म्हणाली, "एक ध्यानात ठिवजो बेटा, काहीबी झालं ,आकाशबी कोसयलं तरीबी तू हिम्मत हा-याची नही! तू आत्ताच हिम्मत हारला तं कसं चालीन? तुह्यवालं पूरं आयुष्य जानंय बारे! कसा करशीन मंग? तुह्या दादाकडे पाह्य, सहा हजार रुप्याकरता ते निस्ती वनवन भटकी राहाले. तुम्हाले नोकरदारायले काम केलं तं पैशे भेटायची खात्री तरी राहाते,आम्हाले शेतक-यायले तं ते बी नी नं भो! कह्यी काय व्ही जाईन काई भरोसा नी! आन मी इचारती नी तं तू बोलता बी नी माले!"
      "तसं नी, तुमी दोघंबी पे-याच्या तनतनमधी होते. पह्यलेच सांगीसन तुमची कायजी नोती वाढोनी मले. पेरा झाल्यावर तुम्हाले सांगनारच व्हता मी! आता येक करजो, दादाले बारे सांगजो नको."
      आकाशातला कोरडा चाललेला मृग आता मंगलाच्या डोळ्यातून बरसत होता.
      जूनचा पहिला पंधरावडा उलटून गेला होता. ढग यायचे आणि हूल देऊन निघून जायचे. विहीरी, बोअरवेल सगळं पार तळाला लागलं होतं. चार-पाच किलोमीटरवरुन लोकांना पाणी आणावं लागत होतं. चा-यासाठी दूरदूर फिरुनही गुरं अर्धपोटी, उपाशी घरी परतत होती. दुभत्या म्हशी असलेल्या शेतक-यांची अवस्था तर फार वाईट होती. सरकी ढेप तर लांबच, म्हशींना साधी कटबा कुट्टी आणी उडदान द्यायलाही ते महाग झाले होते. किमतीच इतक्या वाढल्या होत्या! लोकांची नांगरटी, वखरटी करुन संपली होती. कित्येकांनी महागडी खतं खरेदी करुन शेतात टाकून दिली होती. बैलांना काम नाही, दाणापाणी नाही, मजुरांना काम नाही अशी परिस्थिती होती. हाताला काम नाही त्यामुळे उत्पन्न शून्य! रोजचा खर्च तर चुकत नाही! अशा वेळी महागाईच्या धगीचं निखा-यात रुपांतर झालं होतं. गावोगाव पाण्यासाठी धोंडी निघत होत्या. सगळ्यांच्या डोळ्यातलं पाणी आकाशातल्या पाण्याची वाट बघत होतं. पण आभाळ नुसतं वाकुल्या दाखवत होतं.
      एका दिवशी रात्री किशोरचा मोबाईल वाजला. पलिकडून त्याचा कंपनीतला मित्र बोलत होता.
      "काय रे किशोर, कुठे आहेस तू? दुस-याच दिवशी कुठे गायब झालास?"
      "अरे घरी आलोय, सॉरी यार, जरा घाईतच आलोय त्यामुळे कळवू शकलो नाही तुला मी! बोल काय म्हणतोस?"
      "अरे ऐक ना, एक न्यूज आहे!"
      "काय झालं?"
      "अरे आपल्या कामगार संघटना मॅनेजमेंटशी भांडल्या आणि ज्या पद्धतीने आपल्याला कमी केलं गेलं ते कसं चुकीचं आहे ते मॅनेजमेंटला पटवून दिलं, त्यांनीही ते मान्य केलं आणि आपल्याला जे पेमेंट दिलं होतं, ते दीडपट करुन देणार आहेत आत्ता! संध्याकाळपर्यंत तुला अकाऊंटला कॅश क्रेडिट झाल्याच एसएमएसही येईल! तू तिरमिरीत निघून आलास, तुला कळणार कसं, म्हणून मग मी फोन केला तुला!"
      "थॅंक्स यार, तुला माहिती नाही तू माझा किती मोठा प्रॉब्लेम सोडवला आहेस!"
      "चल किशोर बोलू नंतर" म्हणत त्याने फोन ठेवलासुद्धा!
      किशोर आनंदाने फक्त वेडा व्हायचा बाकी होता. हा आनंद दीडपट पगारापेक्षा पेरणीच्या सोयीचा झालेला होता. नकळत आभाळाकडे त्याचे हात जोडले गेले.
      त्याच्या अश्रूंना आता बाहेरचा धुंवाधार पाऊसही साथ देत होता.
      रात्री पैसे क्रेडिट झाल्याचा एसएमएस आला तेव्हा तर आनंदाने त्याचं मन अगदी भरुन आलं होतं.
      सकाळीच उठून तो भुसावळला गेला, एटीएममधून पैसे काढले आणि उडदाचे बियाणेही घेऊन आला. बापाच्या हातात त्यानं वरुन दहा हजार रुपये ठेवले.
      "दादा, हे घ्या! व्हयी गेली सोय! पगाराचेय!"
      तुकारामने शांतपणे त्याच्याकडे बघितलं, "किशोर, मले सगडं मालूम व्हतं, तुह्या मायनं सगडं सांगलतं मले, पन तू मले पेरा झाल्यावर सांगनार व्हता म्हून मी तुले काही इचारलं नही! पन मले खरंखरं सांग, तू मले बोल्ला काहून नी?"
      "तुम्हीनं तं बी पे-याले पैशे कमी पडी राहाले हे कुढी सांगलं मले? मी करता नी का काही?"
      "अरे तु कायजी करशीन म्हनून मी सांगी नी राहालता, न मी कायजी करीन म्हनून तू बी मले सांगी नी राहालता!"
      "चाला जाऊ द्या, घ्या ते पाभर नं बिजवाई, मी बी ई राहाला पे-याले!"
      "चाल!"
      डोळ्यात पुन्हा नविन आशा घेऊन बापलेक "पेरा" करायला निघाले.
    • कोणी गेलं म्हणुन आपण आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं,

      जगायचा असतो प्रत्येक क्षण उगाच श्वासांना लांबवुन ठेवायचं नसतं.

      आठवणींच्या वाटांवरुन आपल्या स्वप्नांपर्यत पोहचायचं असतं,

      आभाळापर्यत पोहचता येत नसतं कधी

      त्याला खाली खेचायचं असतं.

      कसं ही असलं आयुष्यं आपलं मनापासुन जगायचं असतं,

      कोणी गेलं म्हणुन उगाच आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं.

      दिवस तुझा नसेलही,रात्र तुझीच असेल

      त्या रात्रीला नवं स्वप्न मागायचं असतं,

      तुझ्याच वेड्या श्वासांकडे थोडं जगणं मागायचं असतं.

      कोणी गेलं म्हणुन आपण आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं,
    • का रडतेस आता आणि कशासाठी ?

      कोणीतरी सांगितले रडलीस फक्त
      माझ्यासाठी..

      तेव्हा तर हसत हसत मला दूर केले,

      मग आता रडून दाखवून तू काय सिध्द
      केले..

      जेव्हा मला खरी गरज होती तेव्हा,

      मला तर एकट्यालाचं सोडले..

      मात्र
      तुझ्या सोबतीला कोणीतरी होते,

      म्हणून तू मागे वळून नाही पाहिले..

      आता मला सवय लागली आहे
      तुझ्याशिवाय जगण्याची,

      मग तू का आस लावली आहेस माझी परत
      येण्याची..

      नको रडून मजबूर करूस मला परत
      येण्यासाठी,

      कारण ?????

      आता मी पुन्हा येणार नाही ते
      दुःख सोसण्यासाठी.......

    • आकाशाला गवसणी घालून गगनभेदी भरारी मारणा-या गरुडाला ही पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावं लागत......
      पण त्याचं खाली येणं म्हणजे त्याची हार नसते.....
      पुन्हा एका उंच भरारिची ती तयारी असते...
    • वडील म्हणजे उंबराचं झाड असतं लपलेल्या भावनांचं जणू खोड असतं... वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं पाण्यात न भिजवता किनाराला नेत असतं... वडील म्हणजे वादळातलं घर असतं सुखरुप निवाराचं जणू एक स्थान असतं वडील म्हणजे वादळातलं घरअसतं स्वतःवर वार झेलणारया आश्रयदात्याचं एक रुप असतं...
    • जराचुकीचे, जराबरोबरबोलूकाही;
      चलादोस्तहोआयुष्यावरबोलूकाही!
      उगाचवळसेशब्दांचेहेदेतरहातू,
      भिडलेनाहीतडोळेतोवरबोलूकाही!
      तुफानपाहूनतीरावरकुजबुजल्याहोड्या,
      पाठफिरूदेत्याचीनंतरबोलूकाही!
      ... हवेहवेसेदुःखतुलाजरहवेचआहे,
      नकोनकोसेहळवेकातरबोलूकाही!
      उद्याउद्याचीकितीकाळजीबघरांगेतुन;
      परवाआहेउद्याचनंतरबोलूकाही!
      शब्दअसुदेहातामध्येकाठीम्हणुनी;
      वाटआंधळीप्रवासखडतरबोलूकाही!
      जराचुकीचे, जराबरोबरबोलूकाही;
      चलादोस्तहोआयुष्यावरबोलूकाही!<
    • कायदा एकच...
      तोंड वाजवून न्याय
      मिळत नसेल तर
      तोँडात वाजवून न्याय
      मिळवू पण न्याय
      झालाच पाहिजे वाघ
      तर वाघच असतो
      त्याचा कोणी वाली
      नसतो पण
      महाराष्ट्रात राहून
      मराठी जपतो त्याचाच
      फक्त"महाराष्ट्र"असतो-
    • बॉसने सेक्रेटरीला फोन केला, ''एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोतत्यासाठीची सगळीव्यवस्था कर.''
      सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ''एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर.''
      नव-याने प्रेयसीला फोन केला, ''एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहेतू माझ्या घरीचराहायला ये.''
      प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला, ''मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे.तुला ट्यूशनला सुट्टी.''
      विद्यार्थ्याने बाबांना फोन केला, ''बाबामाझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहेमला कुठेतरी घे‌ऊन चला नाफिरायला.''
      बाबांनी त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला, ''हा आठवडा मी माझ्या मुलाबरोबर घालवणार आहेबाहेरगावी जाणेरद्द.''
      सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ''बाहेरगावी जाणे रद्द.''
      नव-याने प्रेयसीला फोन केला, ''आपली भेट रद्द.''
      प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला, ''माझे जाणे कॅन्सल झाले आहेतुझी ट्यूशन सुरूच राहील.''
      विद्यार्थ्याने बाबांना फोन केला, ''ट्यूशन सुरूच राहणार आहेआपलं जाणं रद्द.''
    • मला माझ्या मित्राने विचारले कि प्रेम म्हणजे नेमके काय ?
      मी त्याला सागितले की,
      कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम....
      दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम....
      कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रे ......म....
      कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम.
      पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम....
      आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको म्हणजे प्रेम.....!
      -- 
    • या जगात कुत्रे कितीही असोत वाघ त्यान्या खातो.मराठी माणसाचा नाद करू नका आम्ही जिवंत गाडतो.
    • विचारांचे सुसाट तारू जाय कुठल्या बंदरा
      मनाच्या शिडातुनी जुना सुगंधी भरे वारा 

      बालपणीचा काळ सुखाचा आठवे स्पर्श मायेचा 
      तिन्हीसांज दिवेलागण अन देवासमोर परवचा

      आजीची माय मिठी नी आजोबांच्या भवती वेढा
      प्रसादातले काळे फुटाणे जत्रेमधला साखर पेढा 

      उद्या कोणता माहीत नव्हता कशाचीही फिकीर नव्हती 
      खात्री होती नेहमी सगळे असतीलच अवती-भवती 

      कुठे गेले दिवस साजिरे केवळ उरल्या आठवणी 
      त्याहि सत्वरी जातील झिजुनी जशी जुनी राजस लेणी 

      आज नव्याची आहे झळाळी नवतेचे स्वागतही आहे 
      तरीही यावे जुने परतुनी भाबडे मन वाट पाहे 

    कुणीतरी हव असत ,जीवनात साथ देनार
    हातात हात घेउन , शब्दान्शिवाय बोलनार्....
    कुणीतरी हव असत ,जीवाला जीव देनार
    फ़ुलातल्या सुगन्धासारख,आयुष्यभर जपनार्......
    कुणीतरी हव असत ,हक्कान् रागावनार,
    चुका ज़ाल्या तरी,मायेन समज़ावनार........
    कुणीतरी हव असत ,आपल म्हननार
    नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार........
    कुणीतरी हव असत ,बरोबर चालणार,
    कशीही वाट असली तरी,माग न फ़िरनार........
    कुणीतरी हव असत ,वास्तवाच भान देणार,
    कल्पनेच्या विश्वातही,माझ्यासवे रमणार......
    कुणीतरी हव असत,मनापासुन धीर देणार,
    स्वतहाच्या दुखातही,मला सामाउन घेणार.........
    कुणीतरी हव असत,एकान्तातही रेन्गाळनार,
    माझ्यासोबत नसतानाही,मझ्यासोबतच असनार....
    कुणीतरी हव असत,विश्वास ठेवणार,
    माझ्या विश्वासाला.कधीही न फ़सवणार...........
    कुणीतरी हव असत,मला समजुन् घेनार,
    आयुष्याच्या वाटेवर साथ देशील क विचारणार.........

    २०/७/१२

    shama