२१/७/१२

मुख्य पान

M4marathi.com , No.1 Marathi Website

  • ती जोशात होती
    मी बेहोश होतो
    ती आशेत होती
    मी नशेत होतो

    ती सूरात होती
    मी बेसूर होतो
    ती तालात होती
    मी बेताल होतो

    ती लयीत होती
    मी सयीत होतो
    ती सहीच होती
    मी नाहीच होतो
  • घराकडे येताना मला काल पावसाने गाठले,

    जोरदार होता पाउस, सगळीकडे तळे साठले....!

    भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी,

    वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची राणी...!

    जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव,

    तिने साद घालून काळजावरती केला...
  • पाहीले मी पाचोळ्याला
    फांद्याना लटकून रडताना,जगताना
    तर कधी फुलण्याआधी
    कळी गळून पडताना
    ऐन बहरात फुलांचा
    रंग उडून जाताना
    अन कुठे सुरकुतल्या देहातूनही उरला
    गंध ओवळून टाकताना

    पाहीले मी डेरेदार वृक्षाखाली
    सावली हरवून जाताना
    तर कुठे इवल्या रोपाखाली
    वारूळ उभे ...
  • या पावसाला काय वेड लागलंय का...?
    वेळ ना काळ
    केव्हाही येतो..
    सकाळ ना संध्याकाळ
    उगाच आपला बरसतो...
    अरे,
    याला कळत कसं नाही...!
    ती मला भेटायला येणार होती..
    वेळात वेळ काढून
    निवांतपणे थांबणार होती...
    ती येणार म्हंटलं की,
    त्याचा कसा होतो बघा जळफळाट..
    त्याच्या...
  • शब्द म्हणजे काय असते ?
    ओघळणारा झरा असते
    सळसळणारा वारा असते
    शब्द म्हणजे असतो डोंगर
    कधी सुगंधी माती असते

    शब्द म्हणजे प्रेम असते
    शब्द म्हणजे माफ़ी असते
    शब्द म्हणजे आठवणींची
    भरलेली टाकी असते

    शब्द कधी असती सुंदर
    कधी हृदयास भिडनारे
    शब्द असती रडता-रडता हसवणार...
  • Marathi Love Poems



  • खंर प्रेम करणारी सर्वचं नसतात,
    अर्ध्यावर सोडून देणारे हि भरपूर असतात..
    खोटी स्वप्ने दाखवुन ह्रदयाशी खेळतात,
    गरज असेपर्यँत आपलं म्हणतात,...
  • प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे

    म्हणून ते प्रेम करायचे नसते,

    नाही मिळाले ते परत तरी

    आपण मात्र त्याच्या भावनाना जपायचे असते,

    दुखवले कितीही तिने

    तरी हसून तीच्या परत
    समोर जायचे असते,

    कुठलीही अपेक्षा न ठेवता देत राहिल्याने

    प्रत्येकवेळी ते प्रेम वाढतच असते,

    ...
  • आयुष्यात प्रेम करायचय मला ...
    दूर कुठेतरी समुद्रकिनारी
    हातात हात घालुन बसायचय मला,
    आकाशातील तारकांकडे बघताना
    भविष्याचे हितगुज करायचय मला,
    आयुष्यात प्रेम करायचय मला ...
    माझ्या मांडीत डोक ठेऊन
    तिला झोपी गेलेल पहायचय मला,
    तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
    स...
  • पुस्तकाच्या आत दडवून
    तिचाच फोटो बघत असतो
    माझा हा वेडेपणा
    तिला कुठे ठाऊक असतो

    तिची यायची जायची वेळ
    पक्की मला ठाऊक असते
    मीही साधतो तिच नेमकी
    पण ती कुठे भावूक असते

    मीच मरत असतो आपला
    तिच्यापाठी वेड्यासारखा
    दिसतो अचानक तिच्यासोबत
    बॉयफ्रेंड तिचा रेड्यासारखा
  • प्रेमात तुझ्या पडलोय तर
    मलाच नमतं घ्यायला हवं
    खूश तुला ठेवण्यासाठी
    सर्वस्व माझं द्यायला हवं

    इतर सर्व गोष्टींपेक्षा
    तुलाच महत्व द्यायला हवं
    प्रेम तुझं वाढेपर्यंत
    सांभाळूनही घ्यायला हवं

    आकंठ तुझ्या प्रेमात बुडून
    प्रेमात तुझ्या न्हायला हवं
    प्रेम ऊतू गेलंच...
  • कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा