२२/४/१२


THURSDAY, NOVEMBER 24, 2011


……………… राहिले

माझी व्यथा मी कुणालाच सांगितली नाही
मी कधीच कुणाची मदत मागितली नाही
आतल्या आत होरपळतच राहिले

मला समजुन घेण्यासाठी बरीच मने जवळ आली
पण मी माझे मन हलके केले नाही
माझी दु:ख मी कुरवाळतच राहिले

जो जवळ यावा असे वाटले तो आलाच नाही
कदाचित तो माझा कधी झालाच नाही
मी उगाचच भरकटत राहिले

अश्रुंना वाट मी सापडूच दिली नाही
त्यांनी अटोकाठ प्रयत्न केला पण
मी त्यांना ही फसवतच राहिले

मन माझे तसे अगदी स्वच्छंदी
पण मी त्याला चौकटीत बांधून ठेवले
उगाच नको ते नियम पाळतच राहिले

आता ठरवले आहे वर्तमानात जगायचे
दर दिवशी एक नविन स्वप्न बघायचे
आज जाणवतय मागे बरेच कIही राहिले

FRIDAY, JUNE 24, 2011

ओलावा



ओला ढग, ओला पाऊस ओलाच थेंब 
मी ही ओला अन ती ही ओली चिंब  
ओली पाने, ओले पक्षी ओलीच माती
मी तिच्या मिठीत आणि माझ्या ती
ओले मन, ओले विचार आणि ओलेच प्रेम
ओल्या सरी ओघळण्यासाठी अंतर जेमतेम
ओला डोंगर ओला समुद्र ओलेच आकाश
ओले ओठ ओले गाणे ओलाच श्वास
ओला दिवस ओला सहवास ओलीच सांज  
ओले डोळे ओले आसू विरह ही ओलाच
ओली गर्दी ओला प्रवास ओलाच विलंब
ओल्या घरी पोहोचायला ओलीच सबब
ओला ओरडा अन आईच्या काळजीचा ओलावा 
मी भिजले नसल्याचा ओलाच दिखावा
भिजलेले कपडे सुखतीलही
पण विसरू कशी तुझी ओली आठवण?
म्हणूनच पुन्हा ओले होण्यासाठी
देते पावसाला उद्याचे ओले निमंत्रण

SUNDAY, JUNE 19, 2011

ते हळुवार दिवस

शाळेचे दिवस म्हणजे मोरपिसासारखे
हळुवार जपलेले आजही मनाच्या वहीत
घट्ट मैत्रीच्या खाल्लेल्या शपथा आणि
उगीचच अबोला धरलेल्या क्षणांच्या सहित

शाळा सुटली आणि पाटी फुटली
सापडेनासे झाले रंगबिरंगी खडू
कंठ फुटला अन मिशा देखील
मिळू लागले जगण्याचे बाळकडू

MONDAY, MAY 30, 2011

बाळा








बाळा तु येणार ही बातमीच गोड
तुझ्या येण्याची सर्वांनाच ओढ
तुझ्या आईचे जीवनच सार्थ
तुझ्या बाबाच्या जगण्याला अर्थ
आजीची जुन्या कपड्यांची जुळवाजुळव
आजोबांना स्वप्नात तु पळव
पुतण्याच्या येण्याने मन भरलेलं काकाचं
आत्तुला छळायला येईल कुणी हक्काचं
मामाच्या गावाला कुणी जाणारं
मावशीचा पापा कुणी घेणारं

तुझे आमच्या आयुष्यात येणे अविस्मरणीय
तुझा तो पहिला वहिला स्पर्श स्वर्गीय
इवलेसे हात अन् चिटुकले पाय
पापण्यांच्या लुकलुकण्यात मन हरवून जाय

तुझे रडणेही आम्हा वाटे रे आलाप
वेळेचे नाही भान, हरवलो आपोआप
हाताचा झुला करू वा मांडीचा बिछाना
पण तुला नाही बघवत आम्हा रडताना

तुला कुशीत घेण्यात एक आगळाच आनंद
ह्रदयाची धडधड कशी ऐकू येई मंद
पण तुझा मात्र गोष्ट सांगण्याचा हट्ट
भीती तुला वाटताच मिठी होई घट्ट

दिवसभराच्या दगदगीनंतर थकूनभागून आल्यावर
शीण सारा पळून जाई बाळा तुला पाहिल्यावर
धावत येशी आम्हापाशी हात पुढे तु करून
उचलून घेता तुला जाई उर आनंदाने भरून

खेळताना तु वाटे पावलोपावली धोका
पडताना पाहून चुके काळजाचा ठोका
खेळताना तुला न राही कशाचेच भान
तुला स्वच्छंद हसताना पाहून आम्हा वाटे छान

बघता बघता शिकलास कधी आमचेच शब्द
उजळणी होता त्यांची होऊन जातो निशब्द
कधीकधी बोलतोस तु असं काही पटकन
कौतुकाने डोळ्यामध्ये बाळा पाणी दाटे टचकन

आम्ही न केलेली हौसमौज तुझ्यात रे पाहू
तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र राबू
आयुष्याचा ठेवा म्हणजे तुझ्या आठवणींची साठवण
राहिल ना रे तुला तुझ्या आईबाबांची आठवण?





WEDNESDAY, JANUARY 27, 2010

अश्रू


दु:ख तसे प्रत्येकाच्याच नशिबी
असते देवाने लिहिलेले
काही लोकांना चिमुठभर
तर काहींना मुठभर वाटलेले

दु:ख तसे लहान मोठे
येत नाही हाताने मोजता
हातांना येते ते फक्त
दुसऱ्यांचे अश्रू पुसता

अश्रू म्हणजे दु:खाची पावती
पापण्यांचा उंबरठा ओलांडल्यावर
गालावरून सरसर ओघळती
पुसण्यास जर नसले हात सांत्वनाचे
तर धरतीमातेला जाऊन मिळती

काही अश्रू करतात फक्त
डोळ्यात निर्माण ओलावा
पापण्यांच्या चिरेबंदी वाड्यात
असे त्यांचा विसावा

आयुष्य एखाद्याचे संपल्यावर
अश्रूंची धार बरसते
ठाव नसते त्यांना बरसल्यावर
की त्यांचेही आयुष्य संपते

अश्रूंना न रंग असतो
ना असतो त्यांना गंध
स्वत: ढळून दुसऱ्याचे
मन मोकळे करण्याचा छंद

अश्रू असतात सदा अबोल
त्यांचा किंचितही न होई आवाज
मेलेल्या सुखाच्या तिरडीवरती
त्यांच्या फुलांचा निशब्द साज

अश्रुंचे अनुशासन कमालीचे
त्यांचे ढळणे देखील एका रांगेत
उतरताना आपल्या गालावरुनी
देतात दु:ख संपल्याचा संकेत

प्रेम असफल झाल्यावरही
लावतात अश्रू हजेरी
पण सांगा मला या अश्रूंनी
प्रेम करावे कोणावरी

अश्रूंची ताकद निराळीच
आगळीच त्यांची कर्तव्य
दु:ख हलके करण्याचे
त्यांच्यात विलक्षण सामर्थ्य

नसतेच अश्रू जर आपल्यापाशी
तर काय होते गत्यंतर
नसते कळले आपल्याला
सुख दु:खातले अंतर

नसते अश्रू जर आपल्यापाशी
तर नसती झाली सुखाची जाणीव
पण असलेल्या गोष्टींची का कधी
भासली आहे मानवाला उणीव

इतकी वर्ष जगुनही मानवाला
कळला न जन्म - मृत्यूचा अर्थ
जन्मताच होतो मृत्यू अश्रूंचा
पण त्यांचे मारणे ही ठरते सार्थ

कुणी म्हणती अश्रू यांना
कुणी म्हणती डोळ्यातील पाणी
आसू म्हणती, आसवे म्हणती
कुणी म्हणती यांना रडगाणी

कुणी म्हणो काहीही पण
अश्रू अनमोल असतात
सगळे काही स्वत: सांगूनही
दुसऱ्यांसाठी अबोल असतात

आनंदातही हजेरी लावण्यास
येतात बऱ्याचदा अश्रू
दु:खात आणि विरहात
येतात सदानकदा अश्रू
जगात येताना आपले अश्रू
आणि आपण गेल्यावर जगाचे अश्रू

तेव्हा अश्रूंना पर्याय नाही
ते अजरामर आहेत
तुमच्या आमच्यातच नव्हे
तर ते जगभर आहेत

WEDNESDAY, NOVEMBER 11, 2009


मरणावर बोलू काही?आयुष्यावर सगळेच बोलतात
दुखाःत बुडतात, आनंदात मोहरतात
पण मरणाचा विषय काढल्यावर
भलेभले देखील घाबरातात

आयुष्यावर साहजिकच जास्त बोलू शकतो
कारण आयुष्याचे आयुष्य मोठे असते
मरणाचा कालावधी तो किती
काळ अन् वेळेची सांगड ती

ब-याच वेळा काळ आलेला असतो पण
वेळेची वेळ झालेली नसते
एरवी सदैव तत्पर असलेल्या यमाच्या
कामात देखील हयगय झालेली असते

आयुष्य हे सर्वतोपरी उपभोगायचे
मरणापूर्वी मात्र भोग भोगायचे
आयुष्याला गरजेची असते ती कामना
मृत्यूला असतात केवळ मरण यातना

आयुष्याला लाभतात ते सुखदुखाःचे क्षण
मरणाची असते ती अंतिम घटिका
आयुष्याचे असते ते तीन अंकी नाटक
मरणाची केवळ लघु एकांकिका

आयुष्याचा शेवट होतो तो मरणाने
ह्या नाहीतर त्या कारणाने
माणूस जगात येतो तो जन्माने
पण ओळखला जातो आपापल्या कर्माने

अनेकांच्या आयुष्यात असेही येतात क्षण
कंटाळून आयुष्याला देवाला मागतात मरण
इथे कळतो जगण्याचा खरा अर्थ
जिथे आयुष्यही जाते मरणाला शरण

आयुष्यभर खरे खोटे बोलल्यावर कळ्ते की
मॄत्यु हे अंतिम सत्य आहे
तुम्हा आम्हांला नवीन असेल
पण यमाला मात्र हे नित्य आहे

जगण्यासाठी करतो आपण दरदिवशी
क्षणोक्षणी एक जीवघेणी धडपड
मेल्यानंतर मात्र केवळ लागते
बांबूची तिरडी अन् पांढरे कापड

जगताना कळत नकळत कुणाकुणावर ओझे टाकतो
मेल्यावर तुमचे ओझे उचलतात ते खांदेकरी
मरणोपरांत तुमच्या आत्म्याला मिळालेल्या
सदगतीचे हेच खरे मानकरी

आयुष्याचा मानवाला लाभलेला अवधी
कुणाचा मोठा तर कुणाचा बारका
जगता जरी आले न एकसारखे
तरी अंत्यविधी मात्र सा-यांचा एकसारखा

लपाछुपीचा खेळ खेळावा असं हे
जीवन मरणाचं क्षणभंगूर नातं
आयुष्यभर नावापुढे लावलेले श्री
क्षणात कैलासवासी होऊन जातं

जगणे हे जर एक प्रवास असेल तर
मरण हे म्हणजे मुक्कामाचे ठिकाण
जगणे हे जर एक शिखर असेल तर
मरण म्हणजे फडकवण्याचे निशाण

शपथविधी झाला

शपथविधी झाला

मतदानाचा हक्क बजावला
निवडणुकीचे निकाल लागले
तेच सरकार निवडून देऊन
जनतेचे पुन्हा बारा वाजले

स्पष्ट मिळाले बहुमत
पण होऊ न शकले एकमत
गृहीत धरलेले लोकमत
किंवा मताची मोजलेली किंमत

सर्वा हवी होती खाती
जेथून पैसे खाता येती
हवालदिल झालेला शेतकरी
अन त्याची गहाण ठेवलेली माती

महाग झालेली साखर तुरडाळ
पाडती खिशाला मोठी भोकं
मटण मच्छी दूर राहिले
भाजीपाल्याने देखील गाठले टोकं

घरोघरी ऑफिस मध्ये
जनमाणसात आहे एकच चर्चा
सांगा राज्यकर्त्यांनो आम्ही
कशा पुऱ्या कराव्या गरजा?

स्वस्त काही राहिले असेल तर
त्या राजकारण्यांच्या शपथा
हे करू अन ते करू म्हणणारे
होती ५ वर्षांकरिता लापत्ता

मतदाराला थोडी अक्कल, थोडा वेळ
अन कळतो थोडासाच कायदा
ह्या अशाच फक्त शिकलेल्या जनतेचा
घेती अडाणी मंत्री गैरफायदा

अमुक पक्ष असो वा तमुक मंत्री
सर्वांचे एकच सर्वव्यापी धोरण
भुकेने जनता मेली तरी चालेल
पण आपल्या दारी लावू सोन्याचे तोरण

तांदळातून खडे निवडायला वेळ लागावा
त्याहूनही कमी वेळात निवडतो आपण उमेदवार
जसा खडा काढावा भातातून
तसाच उमेदवार बाद करण्याचा असावा अधिकार

करंगळी कापून ह्यांचा व्हायला हवा शपथविधी
म्हणजे राहील ह्यांना वचनांची आठवण
तरीदेखील विसर पडला ह्यांना
तर करू ताबडतोब ह्यांची घरी पाठवण

असे केल्यानेच येईल शिवबांचे राज्य
रयतेच्या दारात लागेल आनंदाची दीपमाला
आणि तुम्हा आम्हाला म्हणता येईल
खर्या अर्थाने शपथविधी झाला

स्त्री स्वातंत्र्यातून स्त्रस्त्रयांच्या व्यस्त्रिमत्त्वाचा स्त्रवकास
women freedom personality development अचायय रजनीश , पुणे osho, aacharya rajanish, pune
स्त्रस्त्रया या प्रथमतः स्त्रस्त्रयाच ऄसून, त्या ज्याक्षणी स्वतंत्र व्यस्त्रिमत्त्व धारण करतील, त्याक्षणी हे जग सवायथायनं वेगळं ऄस्त्रधक सुंदर, ऄस्त्रधक अनंदमय होइल.
पुरुषांनी स्त्रस्त्रयांचं मानसशास्त्र पूणयतः दडपून टाकल अहे. अपल्याला जे ददसून येतं ते काही स्त्रस्त्रयाचं खरंखूरं मानसशास्त्र नसून, ‘ पुरुषांनी तयार केलेलं ’, ' पुरुषांनीच स्त्रस्त्रयांमध्ये स्त्रनमायण केलेले ’ ऄसं मानसशास्त्र अहे. खरे पाहू जाता जेवढे समजले जातात स्त्रततके काही स्त्री अस्त्रण पुरुष स्त्रवस्त्रभन्न नाहीत. त्यांचे शरीरशास्त्र वेगळे अहे अस्त्रण त्यांचे मानसशास्त्रही स्त्रनस्त्रितपणे वेगळे अहे. परंतु ते दोघेही दजायने बरोबरीचेच अहेत. पुरुष अस्त्रण स्त्रस्त्रया यांच्यामध्ये गुणात्मकतेचा काही फरक नसून ऄसलाच तर तो एखाद्या स्त्रवस्त्रशष्ट पैलूवर भर देण्यापुरताच मयायददत अहे. जास्त्रणवेच्या पातळीवर स्त्रस्त्रयांमध्ये स्त्रीत्वाचे, तर गुप्तपणे पुरुषांचे गुण ऄसतात. ऄशाच प्रकारे पुरुषांमध्येही गुप्तपणे स्त्रस्त्रयांच्या गुणांचा वास ऄसतो. अपण संपूणयपणे पुरुष ऄथवा स्त्री काहीतरी एकच बनावे यासाठीच अपली मने समाजाकडून घडस्त्रवली जातात. ककबहुना या एकांगी भूस्त्रमकेवरच समाजाकडून ऄस्त्रधक भर ददला जातो. समाज अपल्याला पररवतयनशील होउ न देता ठोकळेबाज, साचेबंद, घडीव बनस्त्रवतो अस्त्रण याचमुळे मानवतेला ईतरती कळा लागते; स्त्री अस्त्रण पुरुष यांचे पूणयत्वच पूणयपणे हरवून जाते !
स्त्रीत्व-मूलभूत व्यस्त्रिमत्त्व
स्त्रस्त्रयांमध्ये काही प्रसंगी स्त्रीत्वापेक्षा पुरुषत्वाचेच गुण प्रकषायने ददसून येतात, तर पुरुषही दकत्येकदा फारच ‘बायकी’ वाटतात. अयुष्यात कोमल क्षणांबरोबरच कठोर क्षणही ऄसू शकतात, चढाइखोरपणाबरोबरच सहनशीलताही येउ शकते... परंतु अजपावेतो ‘पुरुष हा सदैव पुरुषच’ तर
‘स्त्री ही सतत स्त्रीच’ ऄशीच समाजाची धारणा करून देण्यात अली अहे. ही ऄस्त्रतशय ऄनैसर्गगक अस्त्रण चुकीची योजना अहे.
कदास्त्रचत एकादी मुलगी - स्त्री पुरुषाप्रमाणे वागू लागली अस्त्रण ती महत्त्वाकांक्षी, अक्रमणशील ऄसेल तर स्त्रतच्या शरीरांतगयत स्त्रावग्रंथीचाच तो दोष ऄसल्याचं मानलं जातं. ऄशा मुलीला ‘पुरुषी’ मानणं केवळ मूखयपणाचंच अहे. स्वभावाची पुरुषी ककवा बायकी ऄशी स्त्रवभागणी नैसर्गगकरीत्या झालेली नसून राजकीय, सामास्त्रजक कारणासाठीच करण्यत येणारी अहे. सतत ददवसाचे चोवीस तास स्त्रस्त्रयांनी स्त्रस्त्रयांचीच, तर पुरुषांनी पुरुषांची भूस्त्रमका बजावण्याची त्यांच्यावर झालेली सिी ही ऄस्त्रतशय ऄनैसर्गगक ऄसून जगातील बहुतेक दुःखाचा ईगम यातूनच फार मोठ्या प्रमाणावर होतो.
पुरुषांवर ज्यावेळी कोमल, हळूवारपणानं वागण्याचे प्रसंग येतात तेव्हा त्यांच्यामध्ये स्त्रस्त्रयांचे गुण ददसणं, ते जागृत होणं ऄगदी स्वाभास्त्रवक अहे. तर दकत्येकदा रागाच्या भरात स्त्रस्त्रयाही पुरुषांपेक्षा घातकी, कठोर बनतात. ऄसे प्रसंग, भूस्त्रमका सतत बदलत राहणं हेच नैसर्गगक ऄसून सुसंवाद, लय त्यामुळंच स्त्रनमायण होते.
स्त्रस्त्रयांच्या खऱ्या, शाश्वत मानसशास्त्राचं अकलन होण्यासाठी त्यांना संपूणय स्वातंत्र्य देउन पास्त्रहले पास्त्रहजे अस्त्रण अपल्याला अियय वाटेल, ऄसं घडलं तर त्या पुरुषांच्या दकतीतरी पुढं स्त्रनघउन जातील. स्त्रस्त्रयांवरील ऄगस्त्रणत बंधनांबरोबरच त्याच्यावर आतके चुकीचे संस्कार करण्यात अले अहेत, की त्यांच खरं मूळ स्वरूपात मानसशास्त्र ठरस्त्रवणं ऄवघड होउन बसलं अहे. स्वतंत्र व्यस्त्रिमत्त्व ऄसण्याची अवश्यकता मूलभूत अहे. स्त्रस्त्रया या प्रथमतः स्त्रस्त्रयाच ऄसून त्यांचं स्त्रीत्व हेच मूलभूत अहे. त्यामूळंच स्त्रस्त्रया ज्याक्षणी स्वतंत्र व्यस्त्रिमत्त्व धारण करतील त्याक्षणी हे जग सवायथायनं वेगळं, ऄस्त्रधक सुंदर, ऄस्त्रधक अनंदमय बनेल.
ऐस्त्रतहास्त्रसक काळापासूनच स्त्रस्त्रयांचे व्यस्त्रिमत्त्व पुरुषाभोवती केंदित करण्यात अले अहे. ऄसुरस्त्रक्षता, दाररद्र्य यांची भीती सतत ऄसल्यानंच त्या पुरुषांना धरून ऄसतात. त्यांना भयंकर स्त्रभती वाटते; ककबहुना दाखस्त्रवली जाते. पुरुषांचीच ही युिी अहे. भीतीग्रस्त झाल्यावरच स्त्रस्त्रयांवर अस्त्रधपत्य गाजस्त्रवता येतं. स्त्रनभयय माणसावर कोणी हुकूमत दाखवू शकत नसतो.
स्त्री ही ईपभोग्य वस्तू नव्हे
स्त्रस्त्रयांना पूणय स्वातंत्र्य हे स्त्रमळालंच पास्त्रहजे, त्यांच्या स्वातंत्र्याबरोबरच पुरुष सुद्धा स्वतंत्र होतील. आतरांना दास्यामध्ये ठेवून कोणीही खऱ्या ऄथायनं स्वतंत्र होउ शकत नाही. मालक हा नोकराचाच गुलाम ऄसतो. पुरुष हा स्वतंत्र नसतो; कारण तो खऱ्या ऄथायनं तसा स्वतंत्र होउ शकत नाही. जेव्हा स्त्रस्त्रया म्हणजे स्त्रनम्मी मानवजातच पारतंत्र्यात ऄसते, तेव्हा तो कसा स्वतंत्र राहू शकेल ? पुरुषांचं स्वातंत्र्य वरवरचं, केवळ तोंड्देखले ऄसतं स्त्रस्त्रयाच्याच मुिीबरोबर पुरुषही स्त्रवमुि होतील.
खाजगी मालमत्तेचा एक भाग म्हणूनच ( सध्या ऄस्त्रस्तत्वात ऄसलेले ) पती-पत्नी संबंध स्त्रनमायण झाले ( अहेत ). स्त्री ही जर संपूणय अयुष्यभर एकाच पुरुषाच्या मालकीची झाली, रास्त्रहली तर ती त्याची पत्नी होते अस्त्रण फि एका रात्रीपुरतीच कोणा तरी पुरुषाची मालकी स्त्रतनं पत्करली, तर मात्र पत्नी नाही. ‘ स्त्री हीसुद्धा मालमत्ताच अहे,’ हे एकच मूलतत्त्व या सवाांमागे अहे. ककबहुना याचमुळे लग्नसंस्था अस्त्रण वेश्याव्यवसाय हे समाजामध्ये बरोबरीनंच चालत अले अहेत.
माझा ऄसा दृष्टीकोण अहे की, स्त्री एक स्त्रनजीव वा ईपभोग्य नसून एक वेगळी व्यिी अहे. पतीची पत्नीवर ककवा पत्नीची पतीवर कोणाचीही कोणावर मालकी ऄसण्याचं कारण ऄवनतीची अहे.
स्वातंत्र्याची थोडीफार कल्पना अपल्याला स्वतंत्र व्यस्त्रिमत्त्व जोपासण्याची पात्रता अल्यावरच येउ शकेल. समाजामध्ये स्त्रीचा एक वेगळे व्यस्त्रिमत्त्व म्हणून कधीच स्त्रवचार केला जात नाही. ती पत्नी, नंतर अइ व शेवटी अजी होते.... परंतु कधीही एक स्त्री म्हणून ती संबोस्त्रधली जात नाही. स्त्रतला सदैव कोणा दुसऱ्याबरोबरच कोणत्या तरी संदभायत अस्त्रण कोणाशी तरी ऄसणाऱ्या नात्यानंच ओळखलं जातं.
स्त्रीत्वः मानवजातीचा अशादकरण
स्त्रीने स्वतः तर स्त्रीच रास्त्रहले पास्त्रहजे एवढेच नव्हे तर पुरुषांमध्येही थोडे स्त्रस्त्रयांचे गुण अणण्यामध्ये स्त्रतनं त्यांना मदत केली पास्त्रहजे. स्त्रीलाच केवळ पुरुषांबरोबर नव्हे, तर पुरुषांनाही स्त्रस्त्रयांपासून स्वातंत्र्य स्त्रमळणं अवश्यक अहे.
मानवजातीचा एकमेव अशेचा दकरण ‘स्त्रीत्वाचे’ गुण ऄसणं, जोपासणं हाच अहे. स्त्रस्त्रया अस्त्रण पुरुष दोघांनाही स्त्रीगुण ऄसणाऱ्या एका ऄतीव प्रेमाच्या अनंदाच्या ऄवस्थेमध्ये रुपांतररत करणं अवश्यक अहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्री ही वेगली ऄसली तरी त्याच्या बरोबरोचीच अहे. स्त्रतलाही तेवढेच हक्क अहेत. दोघांमध्ये काही फरक जरून अहे, परंतु हा भेद सुंदर ऄसून तो तसा राहणंच अवश्यक अहे.
स्त्री अस्त्रण पुरुषामधील भेद नष्ट करण्याची प्रवृत्ती सध्या पास्त्रिमात्य राष्ट्ांमध्ये वाढीस लागली अहे. पस्त्रिमेतील स्त्रस्त्रया अपल्या स्त्रीत्वाला मुकू लागल्या अहेत. स्त्री अस्त्रण प्रुष यांमधील फरक दूर झाला तरच अपण (स्त्री अस्त्रण पुरुष ) समान दजाांचे मानले जाउ, ऄशीच तेथील-ख्यत्वे स्त्री-मुिीची चळवळ करणाऱ्यांची धारणा अहे. यामागे ‘स्त्री ही पूणयपणे पुरुषाप्रमाणे झाली तरच त्याची बरोबरी करू शकेल,’ ऄशी भावना अहे..... परंतु ऄसा दृष्य सारखेपणा म्हणजे समानता नव्हे, अस्त्रण जर स्त्री ही सवयच बाबतींत पुरुषाच्याचसारखी बनेल तर अपलं सवय अकषयण, सौंदयय, तसंच ऐटही ती गमावून बसेल..... !
[अचायय रजनीश यांनी पुण्याच्या रजनीशा अश्रमामध्ये केलेल्या प्रवचनांपैकी काहींचा समावेश ]

२१/४/१२

Copy right for deeprahul
मीरा के ऩद - Meera Ke Pad दरद न जाण्ाां को् हेयी महहॊ दयदे ददवहणी महहयहॊ दयद न जहणमहॊ कोम। घहमर यी गत घहइर जहणमहॊ, दहवडो अगण सॊजोम। जौहय की गत जौहयी जहणै, क्मह जहणमहॊ जजण खोम। दयद की भहमहां दय दय डोलमहॊ फैद मभलमह नदहॊ कोम। भीयह यी प्रबु ऩीय मभटहॊगहॊ जफ फैद सहॊवयो होम॥ # अब तो हरर नाम लौ लागी सफ जग को मह भहखनचोय, नहभ धमो फैयहगी। कहॊ छोडी वह भोहन भुयरी, कहॊ छोडड सफ गोऩी। भ ॊड भुॊडहई डोयी कहॊ फहॊधी, भहथे भोहन टोऩी। भहतु जसुभतत भहखन कहयन, फहॊध्मो जहको ऩहॊव। स्महभ ककशोय बमे नव गोयह, चैतन्म तहॊको नहॊव। ऩीतहमफय को बहव ददखहवै, कदट कोऩीन कसै। दहस बक्त की दहसी भीयह, यसनह कृष्ण यटे॥ # राम रतन धन ऩा्ो ऩहमो जी महे तो यहभयतन धन ऩहमो। फस्तु अभोरक दी महहये सतगुरु, ककयऩह को अऩणहमो। जनभ जनभ की ऩ ॉजी ऩहई, जग भें सबी खोवहमो। खयचै नदहॊ कोई चोय न रेवै, ददन-ददन फढत सवहमो। सत की नहव खेवदहमह सतगुरु, बवसहगय तय आमो। भीयह के प्रबु गगयधयनहगय, हयख-हयख जस ऩहमो॥ # Copy right for deeprahul हरर बबन कछू न सुहावै ऩयभ सनेही यहभ की नीतत ओर ॊयी आवै। यहभ महहये हभ हैं यहभ के, हरय बफन कछ न सुहहवै। आवण कह गए अजहुॊ न आमे, जजवडह अतत उकरहवै। तुभ दयसण की आस यभैमह, कफ हरय दयस ददरहवै। चयण कॊवर की रगतन रगी तनत, बफन दयसण दुख ऩहवै। भीयह क ॊ प्रबु दयसण दीज्मौ, आॊणद फयणम ॊ न जहवै॥ # झूठी जगमग जोतत आवो सहेलमह यरी कयहॊ हे, ऩय घय गहवण तनवहरय। झ ठह भहणणक भोततमह यी, झ ठी जगभग जोतत। झ ठह सफ आब षण यी, सहॊगच पऩमहजी यी ऩोतत। झ ठह ऩहट ऩटॊफयहये, झ ठह ददखणी चीय। सहॊची पऩमहजी यी ग दडी, जहभे तनयभर यहे सयीय। छप्ऩ बोग फुहहई दे है, इन बोगगन भें दहग। र ण अर णो ही बरो है, अऩणो पऩमहजी को सहग। देणख बफयहणै तनवहॊण क ॊ हे, क्म ॊ उऩजहवै खीज। कहरय अऩणो ही बरो है, जहभें तनऩजै चीज। छैर बफयहणे रहख को हे अऩणे कहज न होइ। तहके सॊग सीधहयतहॊ हे, बरह न कहसी कोइ। वय हीणों आऩणों बरो हे, कोढी कुजष्ट कोइ। जहके सॊग सीधहयतहॊ है, बरह कहै सफ रोइ। अबफनहसी स ॊ फहरवहॊ हे, जजऩस ॊ सहॊची प्रीत। भीयह क ॊ प्रबु मभलमह हे, ऐदह बगतत की यीत॥ # अब तो मेरा राम
भहतह छोडी पऩतह छोडे छोडे सगह बहई। सहधु सॊग फैठ फैठ रोक रहज खोई॥ सतॊ देख दौड आई
अफ तो भेयह यहभ नहभ द सयह न कोई॥ Copy right for deeprahul , जगत देख योई। प्रेभ आॊसु डहय डहय, अभय फेर फोई॥ भहयग भें तहयग मभरे, सॊत यहभ दोई। सॊत सदह शीश यहख ॊ, यहभ हृदम होई॥ अॊत भें से तॊत कहढमो, ऩीछे यही सोई। यहणे बेज्मह पवष कह प्महरह, ऩीवत भस्त होई॥ अफ तो फहत पैर गई, जहनै सफ कोई। दहस भीयह रहर गगयधय, होनी हो सो होई॥ # म्हारे तो गगरधर गोऩाल महहये तो गगयधय गोऩहर द सयो न कोई॥ जहके मसय भोय भुगट भेयो ऩतत सोई। तहत भहत भ्रहत फॊधु आऩनो न कोई॥ छहॉडड दई कुद्दकक कहतन कहह करयहै कोई॥ सॊतन दढग फैदठ फैदठ रोकरहज खोई॥ चुनयीके ककमे ट क ओढ रीन्हीॊ रोई। भोती भ ॉगे उतहय फनभहरह ऩोई॥ अॊसुवन ज सीॊगच सीॊगच प्रेभ फेमर फोई। अफ तो फेर पैर गई आणॉद पर होई॥ बगतत देणख यहजी हुई जगत देणख योई। दहसी भीयह रहर गगयधय तहयो अफ भोही॥
गरीब माणुस दारु पितो,
मध्यमवर्गीय मद्यपान करतो,
तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात!
 काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते,
काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो,
तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते!
गरीब माणुस करतो ते लफडं,
मध्यमवर्गी माणुस करतो ते प्रेम,
तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर!
शब्दाने शब्द वाढला की कविता होते,
शब्दाने शब्द वाढला की भांडण होते
शब्दाने शब्द वाढला की लेखकाची रॉयल्टी वाढते
सगळेच म्हणतात_____
ती असावी अशी ?
फुललेल्या गुलाबाची कळी जशी.........
ती बोलावी अशी ?
सुरात कोकिळा गावी जशी..........
...
ती हसावी अशी ?
लहानशी भाऊली हसावी जशी..........
ती दिसावी अशी ?
अप्सरा पृथ्वीवर यावी जशी............
माझी परी मला हवी कशी ?
ती मला हवी अशी.........
चंद्राकडे हि नसावी चांदणी जशी...........
चंद्राकडे हि नसावी चांदणी जशी.................

मी कधीच नाही म्हटलं कि तू माझी आहेस आपल्या मैत्रीच्या नात्यात पहिल्यापासून परकेपणा होता तो दूर करण्याचा माझा अट्टाहास नह्वे तर केविलवाणा प्रयत्न होता तुला ओळखण्याच्या नादात मी स्वतालाच ओळखू लागलो नि जे काही हरवलं होतं ते सारं शोधू लागलो सापडल्या बऱ्याच गोष्टी, नह्वे नह्वे सारं काही मिळाला पण डोळे उघडून पाहिलं, तेव्हा कुठे आहेस? मी कधीच नाही म्हटलं कि तू माझी आहेस चुकलो असेन मी बऱ्याच वेळा जीवनात नि तू कधीच तिथे नव्हतीस मला सावरण्यात मग आता का तुझी इतकी नड जाणवते? उत्तर माहित नाही पण प्रश्नाने वेड लागते तुला विचारावा म्हटलं तर तू कुठे आहेस? मी कधीच नाही म्हटलं कि तू माझी आहेस तुझी ती कातरवेळ जेव्हा माझा सुगावा घेईल त्या दिवशी माझ्या जन्माचा सार्थक होईल मी अजूनही स्वप्न पाहतो तुझ्या माझ्या मीलनाच पण ते स्वप्न माझ्या एकटयाचच आहे, तू कुठे आहेस? मी कधीच नाही म्हटलं कि तू माझी आहेस मी तुझा होऊ शकलो नाही तरी मी माझाच आता झालोय देवाकडे फक्त तुझ्या सुखाचीच प्रार्थना करतोय एकटा नाही मी सोबत तुझ्या आठवणी आहेत पण वेडं मन सतत विचारेल तू कुठे आहेस? मी कधीच नाही म्हटलं कि तू माझी आहेस .....

deeprahul collection