२७/६/१२

RAHUL

कुठल्या राज्यातल्या मुलीला कसे पटवावे – भाग १

Posted by: Arsie Dillikar on: जानेवारी 23, 2012
नमस्कार मित्रांनो. 
दिल्लीच्या थंडीचा वाढलेला जोर आणि त्या सोबत माझा वाढलेला कामाचा व्याप यांतून सवड काढून मी लिहित आहे तुमच्या साठी एक मस्त पोस्ट.
तुमच्यापैकीच एका मुलाने मला ट्विटर वर DM करून विचारले कि,


“आर्सी दादा तुम्ही स्वता दिल्लीत राहतात तुम्हाला तर भरपूर गर्लफ्रेंड्स असतील. मी असे ऐकले आहे कि दिल्लीचे मुलं मुली पटवण्यात फार हुशार असतात तेव्हा थोड्या टिप्स मला पण द्या. कुठल्या राज्यातल्या मुलींना कसे पटवावे?”

तेव्हा ह्या माझ्या ब्लॉगच्या वाचकाला हेल्प करण्या साठी (आणि त्याच्या सारख्या इतर मुलांना सुध्धा) मी लिहत आहे हि पोस्ट ! दिल्ली हे भारताच्या राजधानीचे शहर आहे, इथे संपूर्ण भारतातून लोक येऊन राहतात तेव्हा माझ्या आणि माझ्या दिल्लीतल्या मित्रांच्या अनुभवांवरून मी सादर करत आहे “कुठल्या राज्यातल्या मुलीला कसे पटवावे -भाग १” यात आहे Simple Dating Tips. कुठल्या राज्यातल्या मुलींसोबत डेट वर असताना कुठल्या गप्पा माराव्या जेणे करून त्या फार खुश होतील आणि तुम्हाला “Like Minded” मानतील.
बघातर मग.
जम्मू आणि काश्मीर – MTV च्या तालावर दूर दर्शनची गाणी लावली तर कसे वाटेल? तश्याच असतात जम्मू आणि काश्मीर च्या मुली. भरपूर हिंसाचार पाहिल्यामुळे ह्या mature असतात. ह्यांना डोकं असत. यांना पटवणे सोपे नसते. इवेन दिल्लीचे सुपर रिच पंजाबी बॉयस सुध्धा यांच्या सोबत डेटवर जाताना थोडे नर्वस असतात. काश्मिरी मुली काश्मिरी मुलांनाच प्रेफर करतात. तरी जर डेट वर गेलाच तर चुकूनसुद्धा आर्मी, युद्ध, पाकिस्तान यांबाबत बोलू नका. काश्मीच्या सौन्दर्याच कौतुक करा. अक्रोड आणि केसर चे मळे कशे असतात हे विचारा. काश्मिरी लोकजीवन आणि भाषा यांबाबत विचारा. ह्यांना खोटं बोललेले अजिबात चालत नाही तेव्हा आतून जे असाल ते ह्यांच्या समोर राहा, माणसे ओळखण्यात ह्या चानाक्ष असतात. जरी ह्यांना पाहिल्यावर मानिनी चित्रपटातला “त्य निरागस चंद्रमा, तू सखी मज शर्वरी ” हे गाना म्हणावसं वाटतं तरी ह्या आतून काय विचार करत आहे ते ओळखणे फारच कठीण असतं. आमच्या दिल्लीत तर भले भले पंजाबी बोय्झ यांच्या मागे लागत नाही कारण त्यांना माहित असते कि काश्मिरी मुली फक्त काश्मिरी मुलांनाच प्रेफर करतात!

हिमाचल प्रदेश – काल परवा पर्यंत ह्या मुलींच्या आयुष्यात डॉक्टर, टीचर किंवा नर्स बनणे हीच एक फार मोठी गोष्ट होती. पण आता बर्याचश्या हिमाचली मुली मोडेलिंग आणि MBA च्या मागे लागलेल्या आहेत. परवा पर्यंत आपल्या सुंदर काश्मिरी चुलत बहिणींना पाहून ह्यांच्या मनात एक न्युनगंड होता पण आता आपल्याच घरातल्या प्रिटी झिंटा, कंगना राणावत ह्या मुलींना पाहून यांचा सुध्ध्दा आत्मविश्वास वाढलाय आणि त्या मुले यांना पण पटवणे पूर्वी इतके सोपे राहिलेले नाहीये. हिमाचल प्रदेश च्या मुलीं बाबत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यांना “हिमाचालन” कधीच म्हणायच नाही! योग्य शब्द “हिमाचली” आहे. ह्यांना हिमाचालन म्हणणे त्यांना उन्कॉम्फोर्ताब्ले फील करवू शकते. तेव्हा “हिमाचली ” बरोबर डेट वर असताना त्यांच्या मनात काश्मीर बद्दल असलेल्या असूयेचा फायदा घ्या. हिमाचल प्रदेश काश्मीर पेक्षा सुंदर कसा? शिमला Switzerland पेक्षा थंड कस? हिमाचली लोग पूर्ण भारतात जास्त प्रेमळ कसे? प्रिटी झिंटा आणि कंगना राणावत बॉलीवूडच्या बेस्ट हेरोइंस कश्या हे तुम्हीच त्यांना हिमाचल प्रदेशच्या कौतुकातून पटवून द्या. न विसरता “शिमला युनिवर्सिटी”, “शिमला”, “सोलन”, “चंबा” ह्या जागे बद्दल भरपूर प्रश्ने विचारा. हिमाचालींना ह्या जागेन्ब्द्दल जाज्वल्य अभिमान आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर खुश होणार्या आणि तेवढ्याच गोष्टींवर नाराज होणाऱ्या ह्या मुली कधी कधी अगदी लहान मुलींसारख्या बिहेव करतात. पण एकदाका जर यांच्याशी मोठ्ठ भांडण झालं तर पैच अप होणे कठीण असते.

उत्तराखंड – अगदी काही वर्षांपूर्वी तयार झालेल्या उत्तरखंड चे लोक आजही जुन्या काळात राहतात. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री येथील पावन संस्कार आणि गोड गोड गढवाली बोली असलेले उत्तराखंड चे लोक साधे, सरळ, पाप भीरु, धार्मिक, परंपरावादी असतात. नैनिताल, मसुरी, देहरादून येथील सुंदर सृष्टी सारख्याच सुंदर मुलींसोबत खोटं बोलणे कितपत योग्य आहे? तेव्हा मित्रांनो तुम्ही जर खरे धार्मिक असाल, down to earth असाल, साधा राहणीमान आणि साधा विचारसरणी वाले असाल तर तुम्हाला कुठलीही उत्तराखंड ची मुलगी पुन्हा डेट वर यायला हो म्हणू शकते. ह्या मुलींसाठी परिवार फार महत्वाचा असतो. घरच्यांच्या मर्जी विरोधात जाऊन कुठलीही मुलगी प्रेम विवाह करणार नाही हे नक्की. तेव्हा मित्रांनो अश्या खर्या अर्थाने भारतीय असलेल्या मुलींना गर्ल फ्रेंड बनवून आयुष्यभराची एक उत्कृष्ट मैत्रीण तर गमावणार नाही न हे नक्की विचार करा. कारण आज काल रिलेशनशिप्स ब्रेक अप होऊन संपतात पण मैत्री कधीच नाही.
तर मित्रांनो आजच्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथील मुलींसाठीच्या डेटिंग टिप्स दिल्या. पुढच्या भागात पुढची राज्ये पाहत हळू हळू पुढे जाऊयात.

Keep in touch,
Lots of LOVE,

Arsie :)
Twitter – @Arsie_Dillikar

Tags: ,

2 प्रतिसाद to "कुठल्या राज्यातल्या मुलीला कसे पटवावे – भाग १"

likhan Sundar…bt ek Go…d gairsamaj hou shakto…uttarekadcha LOVE Guru…kip8up…

तुमचा अभिप्राय नोंदवा

Follow

Get every new post delivered to your Inbox.